पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मणिपुर राज्यात दोन महिलांना विवस्त्र करून धिंड काढत सामुहिक अत्याचाराच्या निषेधार्थ ३० जुलै रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विज्ञान युगातील विद्यार्थ्यांची समाजवादी संघटना छात्रभारतीतर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
याप्रसंगी छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे संदिप जाधव, भुषण वाघ, ज्योती पाटील, चंचल सोनवणे, सायली पाटील, राहुल परदेशी, सुनिल पाटील यांनी निषेधार्थ स्वाक्षरी मोहीम राबविली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ असंख्य नागरिकांनी स्वाक्षरी करत आप आपला निषेध नोंदवला.
२६ जुलै १९९९ कारगील विजय दिवस या विजयासाठी आपल्या सैनिकांनी प्राणाची बाजी लावली. आणि आपण विजयी झालो. परंतु मणिपुर मध्ये ज्या दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली, त्यांच्या शरीराचे लचके तोडून सामूहिक बलात्कार केला. त्यामधील एक महिला ही कारगील मध्ये लढणाऱ्या सैनिकाची पत्नी होती. “मी देशाला वाचवले पण पत्नीला वाचवू शकलो नाही”. सैनिकांच्या पत्नीची जर ही परिस्थीती असेल तर मग विचार करावा लागेल आणि म्हणून आपल्या आई, बहिणींसोबत झालेल्या सामूहिक बलात्कार आणि त्या क्रूर, घृणास्पद घटनेचा निषेध करण्यासाठी आणि न्यायाची मागणी करण्या करीता विज्ञान युगातील विद्यार्थ्यांची समाजवादी संघटना छात्रभारतीतर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.