Home क्राईम हातचलाखीने महिलेचे ६७ हजारांचे दागिने लांबविले

हातचलाखीने महिलेचे ६७ हजारांचे दागिने लांबविले


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात महिलेचे हातचलाखी करुन दोन अज्ञात व्यक्तीने ६७ हजार रुपये किंमतीचे दागिणे लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत सुशीला आनंदा कापडे वय ५३ ही महिला वास्तव्यास आहे. सुशील ह्या शुक्रवारी दुपारी अडीच वाजता तांबापुरा मच्छिमार्केट कडून शिरसोली नाक्याकडे जात असतांना रस्त्यात त्यांना एक अनोखळी महिला व पुरूष भेटले, या दोघांनी हातचलाखी करत सुशीला यांच्याअंगावरील सोन्याचा गोप, सोन्याचे कानातले टोंगल, सोन्याचे डोरले असे एकूण ६७ हजारांचे दागिणे लांबविले. दागिणे चोरीला गेल्याची खात्री झाल्यावर सुशीला कापडे यांनी शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन अनोळखी महिला व पुरूषांविरोधात गुन्हा दाखल करण्यात अाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉस्टेबल सचिन मुंडे हे करीत आहेत

 


Protected Content

Play sound