रावेर प्रतिनिधी । रावेरला उद्दीष्ट संपल्याने मका खरेदी बंद करण्यात आली आहे. यामुळे बाकी राहिलेल्या शेतक-यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.
आता पर्यंत १२३ शेतक-यांची एक कोटी दोन लाख ३४ हजार २०० रूपयांचा ५ हजार ५३२ क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. तर ज्वारी व मका विक्रीसाठी ११७० शेतक-यांनी नंबर लावला होता. तब्बल ९६२ शेतकरी बाकी असतांना शासनाने उर्फाटा निर्णय घेत खरेदी बंद केले आहे. संदर्भात तहसिलदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रर्यत्न केला असता तो होऊ शकला नाही. यंदा तालुक्यात मक्याचे उत्पादन अधिक आहे. आधीच भर दिवाळीत खरेदी केंद्र सुरु न झाल्याने शेतक-यांमध्ये नाराजी होती. त्यातच ११७० शेतक-यांनी मका व ज्वारी विक्रीसाठी नाव नोंदले होते. त्यापैकी फक्त १२३ शेतक-यांचाच मका खरेदी होऊ शकला आहे. तर सुमारे ९६२ शेतकरी अजुन खरेदीच्या प्रतिक्षेत आहेत.
ज्वारी खरेदी सुरुच
येथील खरेदी केंद्रावर मात्र ज्वारी खरेदी सुरु आहे. आतापर्यंत ८५ शेतक-यांचा ४८ लाख ४७ हजार रूपयाचा १ हजार ८५० क्विंटल मका खरेदी केला आहे. यासाठी शासनाने प्रत्येकी २ हजार ६२० रुपये भाव निश्चित केला आहे.