मंत्रालयासमोर आयुष्यात पहिल्यांदाच एवढे पाणी पाहतोय : शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) मंत्रालयासमोर आयुष्यात पहिल्यांदाच एवढे पाणी पाहतोय, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळेंनी केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये दिली आहे.

 

खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार वाय.बी.चव्हाण सेंटरमधून रात्री घरी जात असताना त्यांनी रस्त्यावरील पाणी पाहून फेसबूक लाईव्ह केले. यावेळी सुळे यांनी मंत्रालयासमोरील पाणी म्हणजे समुद्र झालाय, असे म्हटले. यानंतर एवढ्या पावसात कधी एवढे पाणी तुंबले नव्हते, असे म्हणताच शरद पवारांनी पहिल्यांदा आयुष्यात या भागात एवढे पाणी पाहतोय अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने मुंबईतील ४६ वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे.

Protected Content