रावेर,प्रतिनिधी| तालुक्यातील मंगळूर रोडवर उभी केलेली दुचाकी अज्ञाताने लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
या बाबत वृत्त असे की, रावेर तालुक्यातील मंगळुर गावातील रोडवर डिस्कवर कंपनीची दुचाकी (क्र. एमएच १९ एयू ६५३६) उभी केलेली असताना अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. हि घटना शनिवार रोजी घडली आहे. दरम्यान परिसरात व नातेवाकांकडे शोधाशोध केल्यावर १२ हजार रुपये किमतीची दुचाकी मिळून न आल्यामुळे राहुल नारायण पाटील यांच्या फिर्यादी वरुन रावेर पोलिस स्थानकात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पॉ ना कल्पेश अमोदकर करीत आहे.