मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 

 

जळगाव प्रतिनिधी | राज्याचे बहुजन कल्याण, खार जमीन विकास, मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार हे मंगळवार, 26 ऑक्टोबर, 2021 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

मंत्री वडेट्टीवार यांचा दौरा असा : मंगळवार, 26 ऑक्टोबर, 2021 रोजी सकाळी 9.00 वा जळगाव विमानतळ येथे विशेष विमानाने आगमन. सकाळी 9.30 वाजता बऱ्हाणपूरकडे (मध्य प्रदेश) प्रयाण (मार्गे – जळगाव-भुसावळ- मुक्ताईनगर-हतनूर), दुपारी 1.30 वाजता जळगावकडे प्रयाण, दुपारी 3 वाजता जळगाव येथे आगमन व अजिंठा विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 3.45 वाजता जळगाव विमानतळकडे प्रस्थान, दुपारी 4 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व विशेष विमानाने (CJ२) मुंबईकडे प्रयाण करतील.

 

Protected Content