मंगळावर डायनासोरच्या आकारातील दगड, नासाच्या रोवरनं फोटो पाठवला

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । केविन गिल नासामध्ये कार्यरत आहेत. नासाच्या मंगळ ग्रहावरील अ‌ॅडव्हान्स प्रीझर्व्हन्स रोवरनं 15 एप्रिलला पाठवेलेला फोटो गिल यांनी  ट्विटरला शेअर केला आहे.  मंगळ ग्रहावरील  दगड छोट्या आकाराच्या डायनासोर सारखा दिसत आहे.

 

अमेरिकेतील जगप्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था नासाची मंगळ ग्रहावर संशोधन मोहीम सुरु आहे. मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीचं संशोधन करणाऱ्या नासाचा रोवर महत्वाची माहिती नासाकडे पाठवत आहे. नासाच्या रोव्हरकडून मंगळ ग्रहावरील छायचित्र पाठवली जातात. मगंळ ग्रहावरील डायनासोरच्या आकारातील दगडाचा फोटो नुकताच नासामध्ये काम करणाऱ्या केविन गिल यांनी शेअर केला आहे. केविन गिल यांच्यासह जेसोन मेजर यांनी देखील काही फोटो शेअर केले आहेत.

 

 

 

नासाला मंगळ ग्रहावर पाणी उपलब्ध असल्याच पुरावे मिळाले आहेत. नासाला प्राप्त झालेल्या पुराव्यांनुसार मंगळ ग्रहावर काही काळासाठी दुष्काळ तर काही काळामध्ये पाणी उपलब्ध असल्याची माहिती आहे. मंगळ ग्रहाच्या ओबड धोबड जमिनीवर फिरणाऱ्या रोवरच्या पाहणीतून आढळेल्या दगडांच्या रचनेतून पाणी असल्याचं संकेत मिळतात.

 

मंगळावर पाणी असल्याचे पुरावे मिळत आहेत. ओली माती दिसून आली. त्याप्रमाण दमट वातावरण असू शकते. गेल क्रेटरच्या आतमध्ये पाणी भरलं असल्याची शक्यता आहे. नासाला मंगळावर जीवसृष्टी असल्याचे पुरावे मिळण्याची आशा आहे. नासाच्या Curiosity रोवरला Mount Sharp ची संपर्ण माहिती घ्यायची आहे. त्यानंतरच मंगळावरील बदलणाऱ्या वातावरणाची माहिती मिळणार आहे.

Protected Content