जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आर.आर. विद्यालयाजवळ असलेल्या कोठारी मंगल कार्यालयाजवळून एका मजूराची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरट्याने चोरून नेली. या संदर्भात शनिवारी १ एप्रिल रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात माहिती अशी की, संतोष रामकृष्ण देवरे (वय-५२) रा. निमखेडी रोड, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. २६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता संतोष देवरे हे त्यांची दुचाकी (एमएच १९ डीसी १५१७) ने जळगाव शहरातील आर.आर. विद्यालयाजवळ असलेल्या कोठारी मंगल कार्यालय येथे आले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्याने २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. दुपारी २ वाजता काम आटवून संतोष देवरे हे दुचाकी जवळ आले असता त्यांना दुचाकी जागेवर मिळाली नाही. या परिसरात त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतू कोणतीही माहिती न मिळाल्याने अखेर शनिवारी १ एप्रिल रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तुषार जावरे करीत आहे.