नाशिक रोड, प्रतिनिधी । येथील राहिवासी मंगला देवराम बिऱ्हाडे (वय ५६) यांचे दीर्घ आजाराने मंगळवार दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी निधन झाले. सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी देवराम काशिनाथ बिऱ्हाडे यांच्या पत्नी, त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी, सून, दोन नातू असा परिवार आहे. त्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , जळगावचे कर्मचारी विकास बिऱ्हाडे यांच्या मातोश्री होत.