चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील मंगरूळ येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील उसाला विद्यूत तारांच्या शार्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे अडीच एकर मधील सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेची अडावद पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील अडावद येथील शेतकरी राकेश अभिमान ठाकरे (वय-३६) रा. मंगरूळ ता. चोपडा यांची मंगरूळ शेत शिवारात शेत आहे. यंदा त्यांनी अडीच एकर जमीनवर उसाचे पिक लावले होते. रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग लागली. यात अडीच एकर जमीनीवर उस पुर्णपणे जळून खाक झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे यांनी घटनास्थळी धाव घेतली व नुकसानीचा पंचनामा केला. शेतकरी राकेश ठाकरे यांच्या खबरीवरून अडावद पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ फारूख तडवी करीत आहे.