भुसावळ शहरात घरफोडी सत्र सुरु ; चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोकड लांबविली

भुसावळ, प्रतिनिधी  शहरातील खडका रोड भागातील पाटील मळ्यामध्ये पहाटेच्या वेळेस घराचे वालकंपाऊंड ओलांडुन अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोकड लांबविल्याची घटना सकाळी उघडकीस आली.

 

या बाबत वृत्त असे की , शेख अल्ताफ शेख मुस्ताक रेल्वेतील पार्सल ऑफिसमध्ये (क्लर्क) पदावर कार्यरत असून भाड्याने घरात राहतात. शुक्रवार दि. ४ जून २०२१ रोजी सायंकाळी ७.०० वाजेच्या सुमारास जालना या गावी लग्नासाठी परिवारासोबत जातांना त्यांच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून चाबी मालकाकडे देऊन गेले होते. मंगळवार ८ जून २०२१ रोजी सकाळी दुधवाल्याने घर उघडे असल्याने आवाज दिला असता घरातून आवाज न आल्याने घरात जाऊन पाहिले असता घरातील सामा अस्ताव्यस्त पडलेला दिसले.  घरात चोरी झाली असल्याने शेख अल्ताफ शेख मुस्ताक यांचे भाऊ यांच्याकडे दूधवाला जाऊन त्यांनी सांगितले असता भावाने घरमालकाला फोन लावून चोरी झाल्याची माहिती दिली व दोघे घटनास्थळी पोहचले व पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घराचे वॉलकंपाऊंड ओलांडून घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चांदीचे चार लहान मुलांचे कडे, लहान मुलांची सोन्याची अंगठी अर्धा ग्रॅम, ८० सोन्याचे मणी , मंगळसूत्र्याचे सोन्याचे १ ग्रॅम पत्ते, लहान मुलांचा चांदीचा कमर पट्टा व २० ते २५ हजार रुपये रोख असा मुद्देमाल घेऊन पोबारा केल्याची  घटना सकाळी निर्दशनास आली. घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल होऊन पाहणी केली. चोरट्यांचे वॉल कंपाऊंड जवळ लागलेल्या मोटरसायकलवर हाताचे ठसे उमटलेले असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच घर मालकाकडून झालेल्या घटना बाबतची माहिती जाणून घेतली.

 

घरफोडीचे सत्र सुरू ; पोलिसांची रात्रीची गस्त संशयास्पद…

भुसावळ शहरात घरफोडीचे प्रमाण दिवसेन दिवस वाढत आहे. मात्र पोलिसांची रात्रीची गस्त शहरात काही भागात कदाचित होत नसल्याने चोरट्यांना चांगलेच फावले आहे. शहरात चोरट्यांनी घरफोडीचे सत्र सुरू ठेवल्याने पोलिसांना आव्हाहन केले आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडे संशयास्पद नजरेने पाहत आहे.

 

Protected Content