भुसावळ पंचायत समितीत उन्हाळेंना मिळणार सभापतीपदाची संधी

भुसावळ प्रतिनिधी । येथील पंचायत समितीच्या उपसभापती वंदना उन्हाळे यांना एक वर्षासाठी सभापतीपदाची संधी मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.

येथील पंचायत समितीच्या सभापती मनीषा भालचंद्र पाटील व उपसभापती वंदना उन्हाळे यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. मनिषा भालचंद्र पाटील व वंदना उन्हाळे यांनी दीड वर्षे पदे भूषविल्यानंतर आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे.

यानंतर आता पंचाय समिती सभापती व उपसभापतीपदांची निवड प्रक्रिया घेण्यात येणार आहे. यात वंदना उन्हाळे यांना आता सभापतीपदाची तर उपसभापतीपदी म्हणून माजी सभापती प्रीती मुरलीधर पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Protected Content