भुसावळ, दत्तात्रय गुरव | फळे, भाजीपाला व लिंबू मार्केट स्थलांतरीत होत आहे. मार्केट स्थलांतराबाबत विविध शंका उपस्थित करण्यात येत होत्या. मात्र, येथे मालाची संरक्षणाची जबाबदारी चांगल्याप्रकारे घेता येईल असा विश्वास माजी आमदार संतोष चौधरी यांनी व्यक्त केला.
माजी आमदार संतोष चौधरी हे अद्यावत दर्जेदार सुविधांसह नव्याने फळे भाजीपाला मार्केट व लिंबू मार्केटचे लोकार्पणप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी प्रमुखअतिथी म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एजाज अब्दुल गफ्फार मलिक, तालुका शेतकरी संघ अध्यक्ष पंढरीनाथ पाटील हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, वरणगाव माजी नगरसेवक सुधाकर जावळे, भुसावळ नगर परिषद राष्ट्रवादी गटनेते दुर्गेश ठाकूर, भुसावळ नगरसेवक हाजी ईकबाल बागवान, भुसावळ राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष नितीन धांडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिपक मराठे, संतोष चौधरी, अनिल पाटील, नगरसेवक हाजी सलीम पिंजारी, सभापती सचिन संतोष चौधरी, उपसभापती अशोक पाटील, सचिव नितीन पाटील आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1099012317523290