भुसावळ प्रतिनिधी । लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजूरांना आपापल्या गावी जाण्यासाठी परवानगी शासनाने दिल्यानंतर शहरातील सायबर कॅफेवर ई-पास भरण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. लॉकडाऊन सर्रासपणे उल्लंघन होत आहे. सोशल डिस्टन्सिंग नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
ऑनलाईन फॉर्म भरणाऱ्यांना सॅनिटायझर करणे, मास्क वापरणे गरजेचे आहे.तसेच यासाठी वैद्यकिय तपासणी प्रमाणपत्र पालिकेकडून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर ऑनलाईन इ- पास वेबसाइटवर फार्म भरुन घ्यावा लागतो. जे नागरिक स्वत:चे वाहन घेऊन जातील त्यांचा वाहन क्रमांक, ड्रायव्हरचे आधार क्रमांक आणि वैद्यकिय प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून यास परवानगी मिळते. यासाठी पाच व्यक्तींसाठी २० रुपये खर्च येत असून, साधारण दोन ते तीन दिवसात परवानगी दिली जाते. सायबर कॅफे मध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे अवमान केल्याचे दिसत आहे.