भुसावळ : प्रतिनिधी । शहरात गुंजाळ कॉलनी दत्तनगर स्काय जिम समोर खडका रोड भुसावळ भागात सायंकाळी अज्ञात चोरट्यांनी घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून ३० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना सकाळी उघडकीस आली.
पुरुषोत्तम आंबेकर ( वय 70 ) हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांचे बंजारा कॉलनीतील दत्तनगरात स्काय जिम समोर घर आहे त्यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांनी पंचवीस हजार रुपये किमतीचे दोन सोन्याच्या अंगठ्या प्रत्येकी पाच ग्रॅम च्या तसेच पाच हजार रुपये रोख रक्कम असे एकूण तीस हजार रुपयांचा ऐवज फिर्यादीच्या राहत्या घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून देवघरातील कपाटामधून चोरून नेले बाजारपेठ पोलीस स्टेशनला गु.र.न 313 /2021 भा.द.वि. कलम 454, 457, 380 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला व पोलीस कर्मचारी यांनी भेट दिली पुढील तपास पोहेकाँ जितेंद्र पाटील करीत आहे.