भुसावळ प्रतिनिधी । शहरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक पिंटू ठाकूर यांच्या सहकार्याने शहरातील विविध शासकीय कार्यालयात सॅनिटायझर मशीन लावण्यात आले. आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.
कोरोनाच्या पाश्वभुमिवर खबरदारी घेण्यासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील नगरसेवक महेंद्रसिंग ठाकुर उर्फ पिन्टू ठाकुर यांच्यासह शहरातील इतर नगरसेवकांच्या सहकार्याने शहरातील विविध शासकीय कार्यालये तसेच प्रभात स्वयंमचलीत सॅनिटायझरचे मशीन लावण्यात आले आहे. यावेळी आमदार संजय सावकारे यांनी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकुर व नगरसेवकांचे आभार व्यक्त केले.
यावेळी भाजपचे जिल्हा संघटक प्राध्यापक सुनिल नेवे, नगरसेवक अमोल इंगळे, सामाजिक कार्यकर्ते गिरीश महाजन, दिनेश नेमाडे, शैलेश ठाकुरे, अप्पा ठाकरे, रवि ढगे, योगेश तायडे आदी उपस्थित होते.
आमदार सावकारे म्हणाले की, शहरातील विविध शासकीय कार्यालयात तसेच दिनदयालनगर मध्ये सॅनिटायझर मशीनला हात न लावता पायाने बटन दाबून सॅनिटायझेशन होते. कोरोनाच्या पाश्वभुमिवर प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र काल बाजारात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचे दिसुन आले जसे कि कोरोना संपला असे लोकांना वाटत आहे. वस्तू खरेदी करण्यासाठी दिवाळी दसऱ्यासारखी लोक गर्दी करीत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. नागरिकांनी विनाकारण गर्दी केल्यास आपण रेड झोन मध्येच राहु कोरोना कधीच संपणार नाही. ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी सर्वाचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर न पडता घरातच थांबावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.