पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने “मराठी भाषा गौरव दिवस” ग्रंथालय विभागात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे व्हाईस चेअरमन तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन अधिसभा सदस्य विलास जोशी यांनी भूषविले. ते आपल्या मनोगतात म्हणाले की, मराठी भाषा ही फार प्राचीन भाषा आहे. आधुनिक काळात कविवर्य वि. वा. शिरवाडकरांसारख्या कवींनी तिच्या संवर्धनाचे कार्य केले होते. ती जबाबदारी आज आपल्यावर येऊन ठेपली आहे आणि म्हणून मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांनी पेलावी. कुसुमाग्रजांनी आपल्या अजरामर साहित्यकृतीतून मराठी भाषेला समृद्ध केलेले आहे. असे मत त्यांनी प्रकट केले.
यावेळी खानदेशातील ज्येष्ठ साहित्यिक पांडुरंग सुतार यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मनोगतातून कुसुमाग्रजांच्या साहित्यकृतीवर प्रकाश टाकला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. शिरीष पाटील, माजी प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील, उपप्राचार्य तथा मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. वासुदेव वले, प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ हे विचारमंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी कु. दीपिका पाटील, कु. कल्याणी सोनवणे, कु. सलोनी पाटील, कु. भुवनेश्वरी भोईटे, कु. रितू सिसोदे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी दिनांक २० व २१ ऑक्टोबर २०२२ रोजी संस्थेचे माजी अध्यक्ष कै. ओंकार नारायण वाघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ घेण्यात आलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरणही करण्यात आले. त्यात निबंध स्पर्धेत कु. ग्रीष्मा राजेंद्र पाटील (प्रथम), कु. डिंपल दीपक कुमावत (द्वितीय), कु. भाग्यश्री रवींद्र पाटील (तृतीय), कु. राजश्री अनिल पाटील (उत्तेजनार्थ) व कु. वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील (उत्तेजनार्थ) तर वक्तृत्व स्पर्धेत कु. रितू सुधीर सिसोदे (प्रथम), कु. प्रियंका कैलास चांगरे (द्वितीय), कु. एकता संजय अग्रवाल (तृतीय) व कु. तनया लक्ष्मण जाधव (उत्तेजनार्थ) या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. त्याबरोबरच विजेत्या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ कवी पांडुरंग सुतार यांच्याकडून कविता संग्रह बक्षीस म्हणून देण्यात आले. याप्रसंगी ग्रंथपाल प्रा. पी. एम. डोंगरे, डॉ. के. एस. इंगळे, प्रा. वाय. बी. पुरी, डॉ. क्रांती सोनवणे, डॉ. सिमा सैंदाणे, प्रा. इंदिरा लोखंडे, प्रा. सुवर्णा पाटील, डॉ. जितेंद्र सोनवणे, प्रा. नितीन पाटील, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. उर्मिला पाटील, प्रा. कृतिका गोसावी, प्रा. गायत्री भोसले, प्रा. रोहित पवार, प्रा. अधिकराव पाटील, प्रा. विशाल पाटील, प्रा. स्वप्निल भोसले, विजय पाटील, विजय सोनजे, देविदास चौधरी, उमेश माळी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य तथा मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी केले. तर सूत्रसंचलन प्रा. स्वप्निल भोसले व आभार प्रदर्शन प्रा. अधिकराव पाटील यांनी केले.