यावल प्रतिनिधी । तालुक्यातील भालशिव पिंप्री येथे एका अगंणवाडी सेविकेचा विनयभंग केल्याची घटना घडती असुन याबाबत यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार यावल तालुक्यातील भालशिव पिंप्री या गावात दिनांक १२ जुन रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास एक अंगणवाडी सेविका कार्य करत असतांना गावातील रहिवासी लक्ष्मण जानकीराम सपकाळे याने वाद करून हुज्जत घातली. तुम्ही शासनाकडुन शाळकरी मुलांना पुर्णधान्य वाटप करीत नसतात त्याचबरोबर शाळकरी मुलांना मिळणारे अंडी व धान्य तुम्ही आपल्या घरी घेवुन जातात असे बोलुन सेवीकेच्या हातातील विद्यार्थ्यांच्या नांव नोंदणीचे असलेले रजिस्टर ओढुन अंगनवाडी सेविकेशी धक्काबुकी करून अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली. याबाबत त्या अंगनवाडी सेविकेने यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून भाग५ गु. र .न.१०२ / २०२० प्रमाणे विविध कलमान्वये लक्ष्मण जानकीराम सपकाळे यांच्या विरूद गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी नागपाल विश्वनाथ भास्कर हे करीत आहेत.