उत्तर प्रदेशात बसला भीषण अपघात ; पाच जण जागीच ठार !

लखनऊ (वृत्तसंस्था) आज (रविवार) सकाळी उत्तर प्रदेशमधील कन्नौज येथे लखनऊ – आग्रा महामार्गावर एका बसला झालेल्या भीषण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. या बसमध्ये जवळपास ४० ते ५० जण या बसमध्ये प्रवास करत होते.

 

कन्नौजच्या सौरीख जवळ समोर उभ्या असलेल्या एका कारला भरधाव वेगात असलेली ही बस धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनं महामार्गावरून खाली येऊन पडली. अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींना कन्नौज येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि इटावा येथील सैफई येथे दाखल करण्यात आले आहे. ही बस बिहारहून कामगारांना घेऊन दिल्लीकडे जात होती.

Protected Content