भारत विकास परिषदतर्फे वृक्षारोपण

 

 

जळगाव  : प्रतिनिधी ।  भारत विकास परिषदेच्या ५९ व्या स्थापना दिवसानिमित्त जळगाव शाखेतर्फे पिंप्राळा येथील जुन्या सिल्क मिल समोरील कॉलनीमध्ये रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली.

 

या रोपांना संरक्षक जाळी व ठिबक सिंचनाच्या नळ्या परिषदेतर्फे पुरवून परिसरातील रहिवाषांनी वृक्ष संगोपनाचा संकल्प केलेला आहे.

 

भारत विकास परिषद दरवर्षी शहरातील विविध भागात वृक्ष लागवड करून त्यांच्या संगोपनाची व्यवस्था करत असते. मागील ४ वर्षात रामानंदनगर घाट परिसरात वृक्ष लागवड व संगोपन करीत परिसर हिरवागार झालेला आपणांस  दिसून येतो.

 

याप्रसंगी भाविपचे तुषार तोतला यांनी  प्रास्ताविक केले . अध्यक्ष उज्वल चौधरी, सचिव डॉ. योगेश पाटील, उमेश पाटील, गिरीश शिंदे, प्रसन्न मांडे, हर्ष खाडिलकर, सुनील गुरव, सुभाष तळेले, दीपक खडके,  जान्हवी खाडिलकर,  राधिका नारखेडे,  वैशाली गोरे, अर्चना गुरव व सर्व सभासद सहपरीवार उपस्थित होते

 

या परिसरात चालणाऱ्या रा स्व संघाच्या प्रभात शाखेचे संदीप कासार,  गरुड, जनता बँकेचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला,  जनता बँकेचे संचालक सतीश मदाने,  बळवंत नागरी सह. पतसंस्थेचे मधुकर पाटिल, पद्मनाभ देशपांडे, नाना वाघ, ज्ञानेश्वर देशमाने व शाखेचे स्वयंसेवकही  उपस्थित होते.

 

Protected Content