एरंडोल प्रतिनिधी । राष्ट्रीय कृषी दिवसाच्या अनुषंगाने भारतीय स्टेट बँक एरंडोलशाखेतर्फे कृषी दिवसानिमित्ताने शेतकरी बांधवांचा व भगिनींचा सत्कार करण्यात आला.
शेतकरी बांधव व भागीनीचा सत्कारप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे, मंडळ कृषी अधिकारी प्राजक्ता पाटील, तंत्र सहाय्यक वीरेंद्र महाजन होते. शाखेचे प्रबंधक आशिष मेंढे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. कृषी अधिकारी शरद बोरसे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, शेतकऱ्यांच्या विकासातच देशाचा विकास असल्याचे सांगुन अनुत्पादक गोष्टींवर खर्च करण्यापेक्षा बँकेच्या योजनांचा उपयोग करून शेतीचा विकास केल्यास प्रगती साधता येते असे सांगितले. सूत्रसंचालन राहुल जाधव व आभार प्रशांत पेंढारकर यांनी मानले. याप्रसंगी कृषिभूषण शेतकरी समाधान पाटील, शालिग्राम गायकवाड, ईश्वर पाटील, रवींद्र पाटील व शाखेचे शेतकरी ग्राहक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी देवेंद्र कुमार, पुरुषोत्तम महाजन, लक्ष्मण महाजन, रघुनाथ मोरे यांनी कामकाज पहिले.