बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बोदवड शहरासह तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने नुकतेच महिलांचे व पुरुषांचे श्रामनेर शिबिर पार पडले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोदवड येथील तक्षशिला बुद्ध विहार मध्ये श्रामनेर शिबिर दिनांक १५ ते २४ आयोजन करण्यात आले होते. यासोबत महिला धम्म उपासिका शिबिर त्रिरत्न बुद्ध विहार करंजी येथे समारोप करण्यात आले. त्याचप्रमाणे २९/१०/ २०२३ ते ७/११/२०२३ निमखेडी ता.बोदवड येथे महिला धम्म उपासिका शिबिर आज रोजी सुरू आहे. या शिबिरांमध्ये वरिष्ठ केंद्रीय शिक्षिका माधुरीताई भालेराव,वरिष्ठ केंद्रीय शिक्षिका वैशालीताई सरदार यांचे मार्गदर्शन लाभ आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शांताराम मोरे, जिल्ह्यातील पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष, केंद्रीय शिक्षक सुशील कुमार हिवाळे व जिल्हा पर्यटन विभाग केंद्रीय शिक्षक वसंत लोखंडे,जिल्हा संघटक केंद्रीय शिक्षक मार्गदर्शक बि. के.बोदडे,जिला संरक्षण सचिव एस.पी.जोहरे भुसावल,ता.अध्यक्ष उत्तम सुरवाड़े,विशाल गायकवाड,आनंद सपकाळे,रावेर केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे गुरुजी,अटकाळे बोदवड तालुक्यातील तालुका शहर अध्यक्ष जगन गुरचळ,गोविंदा तायडे , तालुका हिशोब तपासणीस रमेश इंगळे ,तालुका कोषाध्यक्ष भास्कर गुरचळ,ता.महिला उपाध्यक्ष पालवे ताई व त्यांची महिला टिम यांनी कार्यक्रमला आपली उपस्थिति दिली.ता. संगटक भीमराव शंकर सुरवाड़े,ता.संघटक जिवन बोदडे,ता. संरक्षण विभाग शामराव बोदडे,निलेश बोदडे, सर्वानी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांच्या हस्ते महिला उपासिकांना प्रमाणपत्र देण्यात आले व उपासिकांनी आपले मनोगत व्यक्त केले. नंतर सर्वांनी भोजन ग्रहन केले सर्वांचें तालुका सरचिटणीस यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला ता. सरचिटणीस प्रमोद सुरवाडे,ता.संघटक भिमराव सुरवाडे,धम्मंसेवक रविंद्र भालेराव,अजय सुरवाडे,विशाल सुरवाडे,विकी सुरवाडे,सुनील शेजोले,अशोक सुरवाडे,मयुर सुरवाडे,रोहित सुरवाडे, प्रसिद्धी प्रमुख मान्यवर नंदलाल पठे, मुक्ताईनगर जामनेर,भुसावळ तालुक्यातील सर्व पदाधिकारी वाड्यातील बौध्द उपासक,उपासिका,बाल मित्र उपस्थित होते. श्रामनेर शिबिरात जीवन जगण्याचे पंचशीलाचे तत्व सांगितले जाते. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी व पुरुषांनी यामध्ये भाग घ्यावा असे आव्हान तालुकाध्यक्ष शांताराम मोरे यांनी शेवटी बोलतांना केले.