‘दृश्यम’ फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन !

हैदराबाद (वृत्तसंस्था) ‘डोंबिवली फास्ट’, ‘दृश्यम’ फेम दिग्दर्शक निशिकांत कामतचे नुकतेच हैदराबाद येथे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली होती आणि त्याच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र अखेर त्याची आज प्राणज्योत मालवली.

 

 

निशिकांत कामत यांचे लिव्हर अर्थात यकृताशी संबंधित आजारामुळे त्याच्यावर हैदराबादमधील गच्चीबोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’ यासारखे खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन त्याने केले होते. दृष्यम, मदारी, मुंबई मेरी जान यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटातून निशिकांत कामत यांनी आपला ठसा बॉलिवूडमध्ये उमटवला आहे. त्याआधी डोंबिवली फास्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतर निशिकांत कामत हे नाव सर्व महाराष्ट्राला परिचीत झालं. डोंबिवली फास्ट चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याव्यतिरीक्त जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम चित्रपटात निशिकांत कामत यांनी खलनायकाची भूमिका केली. वयाच्या ५० व्या वर्षी निशिकांत कामत याने अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती चिंताजनक होती.

 

 

Protected Content