धरणगाव, प्रतिनिधी । येथील क्वारंटाइन सेंटर व कोव्हिड सेंटर या दोन्ही ठिकाणी दररोज रात्री १५ लिटर दुधाचे वाटप करण्यात येत होते. कोव्हिड रुग्ण व कोविड संशयित क्वारंटाइन नागरिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढावी व त्यांनी कोरोनावर विजय मिळवावा व सुकरूप आपल्या परिवारात घरी परत यावे यासाठीभारतीय जनता पार्टीतर्फे हळद व अद्रक युक्त दूध दिले जात होते.
क्वारंटाइन सेंटर व कोव्हिड सेंटरमध्ये दूध वाटपाची सेवा कारण्यासाठी धरणगाव भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग दिला. यात शिरीष बयस, कैलास माळी , संजय महाजन, पुनीलाल महाजन, दिलीप महाजन, सुनील चौधरी, शरद कंखरे, गुलाब मराठे, ललित येवले, कडू बयस, भालचंद्र माळी, सचिन पाटील, टोनी महाजन, कांतीलाल माळी, कनैय्या रायपूरकर, योगेश(विकी) माळी तसेच इतर कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला. दररोज रात्री दूध वितरित करायला कैलास माळी , किरण वराळे, भरत भाटिया, दीपक धनगर व सूरज तेली हे जात होते.