खाण्यापिण्याचे वेळापत्रक चुकूनही डॉक्टर्स करतात तन्मयतेने कार्य :रवींद्र भोळे

पुणे प्रतिनिधी । रुग्णांच्या औषधांच्या, इंजेक्शनच्या आणि उपचारांच्या वेळा सांभाळताना स्वतःच्या खाण्यापिण्याचे वेळापत्रक कधी चुकते याचेही डॉक्टरांना कधी भान राहत नाही. परंतु तितक्याच तन्मयतेने आणि सेवाभावाने प्रत्येक डॉक्टर कार्य करीत असतो , असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते डॉ.रवींद्र भोळे यांनी उरुळीकांचन येथे केले.

आज कोरोनासारख्या गंभीर संकटातही तितक्याच खंबीरपणे प्रत्येक डॉक्टर कार्य करीत आहेत. रुग्णांची काळजी घेण्यासाठी स्वतःच्या आरोग्याकडे जीवाकडे दुर्लक्ष करून त्यांच्यासाठी धडपडणारा प्रत्येक डॉक्टर पाहिला की, मला त्यांच्याविषयी खरोखर खूप कृतज्ञता वाटते असेही मत जेष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी व्यक्त केले. यावेळी हवेली तालुका पत्रकार संघाचे सचिव अमोल भोसले, हवेली तालुका महानुभाव परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार मुरकुटे यांच्या हस्ते डॉक्टर दिवसानिमित्त उरुळीकांचन परिसरातील गोरगरीब रुग्णांची सेवा करत असल्याने डॉ. भोळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अनेकांची उपस्थिती होती.

Protected Content