जळगाव, प्रतिनिधी । आज दि. १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे सोशल डिस्टन्सीं चे पालन करत साजरी करण्यात आली.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजप जळगाव जिल्हा महानगरतर्फे त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करून साजरी करण्यात अली. माल्यार्पण आमदार सुरेश भोळे यांच्या हास्ते करण्यात आले. अभिवादन माहानगरचे जिल्हाध्याक्ष दिपक सुर्यवंशी यांनी केले. याप्रसंगी जिल्हा सरचिटनीस डाॅ. राधेश्याम चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष सुनील माळी, सरचिटनीस महेश जोशी, नितिन इंगळे , गणेश माळी आदि उपस्थिति होते. तर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा महानगरच्या ९ ही मंडलांमध्ये मंडळ अध्यक्ष, नगरसेवक व मंडल पदाधिकारी यांनी आप आपल्या मंडलात चार ते पाच कार्यकर्त्यांनी मिळून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सोशल डिस्टनसिंगचे तंतोतंत पालन करत ही जयंती साजरी करत भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची देवाण-घेवाण करून सोशल मीडियाच्या माध्यमातून व डिजिटल पध्दतिने साजरी करण्यात यावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी केले आहे.