भारतीयांना दिलेल्या लसींपेक्षा अधिक लसी परदेशात

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । काँग्रेस प्रवक्त्या डॉ. शामा मोहम्मद यांनी ट्विटरवरुन  टीका केली आहे.  देशातील नागरिकांना दिल्यापेक्षा  अधिक डोस परदेशामध्ये निर्यात केलेत, असं भाजपा सरकारने संयुक्त राष्ट्रांसमोर सांगितलं आहे. कोरोना लसींचे डोस निर्यात करण्याआधी भारतीयांना प्राधान्य दिलं अशतं तर दुसरी लाट थांबवता आली असती,” अशी टीका शामा यांनी केली आहे.

 

शुक्रवारी देशामध्ये कोरोनाबाधितांची संख्या तब्बल ६२ हजारांनी वाढली. २४ तासांमधील ही २०२१ मधील सर्वात मोठी वाढ छरली आहे. १६ ऑक्टोबरनंतर म्हणजेच पाच महिन्यानंतर पहिल्यांदाच एका दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. देशातील एकूण  रुग्णांची संख्या १ कोटी १९ लाखांहून अधिक झाल्याची माहिती आरोग्यमंत्रालयाने दिली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये दुसरी लाट आल्याची घोषणा काही आठवड्यांपूर्वीच केंद्राकडून करण्यात आली. मात्र आता देशातील इतर राज्यांमध्येही बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. याचवर आता काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्रांमध्ये केलेल्या दाव्याच्या आधारे काँग्रेसने भाजपाच्या कोरोना नियंत्रणासंदर्भातील धोरणांवर टीका केलीय.

 

दीड महिन्यांपासून भारताने ७० हून अधिक देशांना कोरोना लसींचे डोस पुरवले आहेत.

Protected Content