इस्लामाबाद : वृटत्तसंस्था । भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांवर केलेल्या बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. पाकिस्तानातील एका राजकीय नेत्याने ही माहिती दिली आहे
जम्मू-काश्मीरच्या पुपलवामा येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याचं उत्तर म्हणून भारताने २६ फेब्रुवारीला नियंत्रण रेषा पार करत पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता. हा एअर स्ट्राईक जैश-ए-मोहम्मद नावाच्या दहशतवादी संघटनेच्या ‘प्रशिक्षण शिबिरं’ असणाऱ्या ठिकाणांवर करण्यात आला होता.
बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने केलेल्या दाव्यानुसार, यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. पण, पाकिस्तानातील एका बड्या राजकीय व्यक्ती अघा हिलाली यांचा हा खुलासा पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या सर्व दाव्यांच्या विरोधात आहे.
अघा हिलाली ने म्हटलं, “भारताने आंतरराष्ट्रीय सीमेला पार केलं आणि एका युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली होती. यामध्ये ३०० मृत्यूंची नोंद करण्यात आली. आमचं टार्गेट त्यांच्यापेक्षा वेगळं होतं. आम्ही त्यांच्या हाय कमांडला टार्गेट केलं होतं. कारण, तिथे उपस्थित असलेले लोक लष्कराचे होते. आम्ही त्यांना सांगितलं की ते जे काही करतील त्याचं उत्तर आम्ही देऊ”
‘अघा हिलाली यांचं हे वक्तव्य पाकिस्तान मुस्लिम लीग – नवाजचे नेते अयाज सादिक यांच्या वक्तव्यानंतर आलं आहे. “जर पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडलं नाही तर भारत रात्री नऊ वाजता पाकिस्तानवर हल्ला करेल, असं परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी सांगितलं होतं”, असं सादिक यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये पाकच्या नॅशनल असेंब्लीमध्ये म्हटलं होतं.