नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात कोरोनावर लस शोधण्यात येत असून भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय) ने मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे. ‘कोवॅक्सिन’ नावाची लस भारत बायोटेकने इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही)सोबत एकत्र येऊन तयार केली आहे. दरम्यान, १५ ऑगस्टपर्यंत या लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण करण्याचे निर्देश आयसीएमआर (ICMR) ने दिले आहेत.
भारतात तयार केली कोरोनावर लस शोधण्यात आली असून भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय) ने मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे. ‘कोवॅक्सिन’ नावाची लस भारत बायोटेकने इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही)सोबत एकत्र येऊन तयार केली आहे. हैदराबादची फार्मास्यूटिकल कंपनी भारत बायोटेकने ही लस तयार केली आहे. भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय) ने मानवी चाचणीसाठी परवानगी दिली होती ‘कोवाक्सिन’ नावाची लस भारत बायोटेकने इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही)सोबत एकत्र येऊन तयार केली आहे. ICMR चे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांनी एक पत्र जारी केलं असून यात 7 जुलैपासून या लसीची मानवी चाचणी सुरु होईल. यामुळे 15 ऑगस्टपर्यंत सामान्यांसाठी लॉन्च केले जावे, असे म्हटले आहे. दरम्यान, भारत बायोटेक या कंपनीने यापूर्वी पोलिओ, रेबिज, चिकनगुनिया, रोटाव्हायरस अशा विषाणूंवरही लसी विकसीत केल्या आहेत. त्यामुळे आता कोरोनावरील लसीच्या चाचणीवर साऱ्या देशासह जगाचेही लक्ष लागून आहे.