जळगाव, प्रतिनिधी । भारतात जनावरे मोजले जातात पण माणसे मोजले जात नाही,अशी खंत नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आयोजित ओ.बी.सी.जातीनिहाय जनगणना मोहिमेत “जनगणना पे चर्चा” या कार्यक्रमात बोलत होते. याकार्यक्रमाचे आयोजन सहकार बोर्ड भुवन जळगाव याठिकाणी शुक्रवार १३ मार्च रोजी करण्यात आले होते.
प्रमुख मार्गदर्शक बाळासाहेब कर्डक यांनी ओबीसींची जातीनिहाय जनगणना किती आवश्यक आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रत्येक समता सैनिक तालुका अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांनी याबाबत विविध बैठका, मेळावे, कार्यक्रम आदींमधून लोकांमध्ये जनजागृती करून ओबीसी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, संपर्कप्रमुख अनिल नाळे, सोशल मीडिया प्रमुख संतोष, जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, कार्याध्यक्ष वसंत पाटील, उपाध्यक्ष बापू महाजन, पारोळा , शालिग्राम मालकर, भिकन सोनवणे, विजय महाजन, तालुकाध्यक्ष संतोष महाजन, चाळीसगाव तालुका अध्यक्ष कैलास जाधव,पाचोरा तालुका अध्यक्ष संतोष परदेशी, महिला महानगरप्रमुख भारती काळे, निवेदिता ताठे, शकुंतला ताई महाजन, सुनील माळी, रमेश महाजन, संध्या माळी, सीमा बिराडे, प्रकाश महाजन, भूषण महाजन, योगेश महाजन, गजानन महाजन, कृष्णा माळी, राम सैनी, गणेश माळी,योगेश रोकडे, धनराज महाजन, रमेश महाजन संदीप पाटील, धिरज महाजन, मनोज भांडारकर, भगवान रोकडे, जिल्हाभरातून समता परिषदेचे तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकारणी सदस्य सर्व पदाधिकारी व असंख्य समता सैनिक उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब कर्डक यांचे हस्ते ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे असा मजकूर असलेले दहा हजार पोस्टकार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आले. यावेळी समता परिषदे चे कार्याध्यक्ष वसंत पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जिल्हाध्यक्ष सतीश महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पारोळा तालुका अध्यक्ष संतोष महाजन यांनी तर आभार योगेश रोकडे यांनी मानले.