Home क्राईम भादली येथे एकाला मारहाण

भादली येथे एकाला मारहाण

0
47

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातील उडीद अंगणात टाकल्याच्या कारणावरून शेतकऱ्याला दोन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना भादली बुद्रुक येथे घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी सायंकाळी ७ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अभिमन्यू कडू कोळी (वय-६२) रा. शेळगाव भादली बुद्रुक ता.जि.जळगाव हे आपल्या परिवारासह राहतात. शेती करून उदरनिर्वाह चालवितात. मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्याशेजारी राहणारे गणेश छगन कोळी यांनी अभिमन्य कोळी यांच्या अंगणात उडीद सुकवण्यासाठी टाकलेला होता. अभिमन्यू यांनी उडीद अंगणात टाकल्याचे विचारणा केली असता गणेश छगन कोळी, मिराबाई छगन कोळी दोन्ही रा. भादली यांनी शिवीगाळ करून मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

यासंदर्भात अभिमन्यू यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवू तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ८ वाजता गणेश छगन कोळी, मिराबाई छगन कोळी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अलियार खान करीत आहे.


Protected Content

Play sound