‘त्या’ बालकाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या अज्ञातांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाजवळील रेल्वे ट्रॅकजवळ एका शालमध्ये १ महिन्याच्या बालकाचा मयतस्थितीत बेवारसरित्या मृतदेह आढळून आले आहे. यासंदर्भात मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी नगरातील रेल्वे उड्डाणपुल तयार होवून नागरीकांसाठी खूला करण्यात आला आहे. मंगळवारी ३० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास रेल्वे ट्रॅकजवळ अंदाजे एक महिन्यचे बालकाचा बेवारसरित्या मृतदेह आढळूल आला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदीप परदेशी, पोलीस नाईक ललीत भदाणे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेवून पंचनामा केला होता . दरम्यान, बालकाच्या मृतदेहाजवळ कपडे, औषधी, काळा दोरा, दुध पिण्याची बाटली अश्या वस्तू आढळून आले होते. या बालकाला कुणी पुरले याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर घटनेच्या आठ दिवसानंतर मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात बालकाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौसदार सिध्दार्थ बैसाने करीत आहे.

Protected Content