जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भादली येथे खळवाडीतील चाऱ्याला अचानक आग लागण्याची घटना दुपारी घडली. महानगरपालिकेच्या दोन बंबांद्वारे ही आग आटोक्यात आणली असून आगती २५ हजार रूपयांचा चारा जळून खाक झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भादली येथील शेतकरी भीमराव तुकाराम कोळी हे शेतकरी असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. गावाच्या बाहेर असलेल्या खळवाळीत गुरांसाठी चारा ठेवला होता. मंगळवार १९ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अचानकपणे खळ्यातील चाऱ्याला आग लागल्याने खळबळ उडाली. आग लागल्याचे समजल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी महापालिका अग्निशमन विभागाला संपर्क साधून माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता अग्निशमन पथक घटनास्थळी रवाना झाले. यामध्ये २५ हजार रुपये किमतीचा गुरांचा चारा जळून खाक झाला आहे. अग्निशमन विभागाच्या दोन बंबांद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली. आग विझवण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्मचारी संतोष तायडे, परमेश्वर कोळी, नितीन बारी, भगवान जाधव, किशोर पाटील, युसुफ पटेल, नंदकिशोर खडके, मोहन भाकरे यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले .शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत आगीबाबत पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3213979615595369