जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना एकक द्वारे शहरातील पिंप्राळा बाजारात भाजीपाला विक्रेता महिलांना तीव्र उन्हापासून संरक्षण मिळावे, या हेतूने ५० सनकोट वाटप करण्यात आले.
मागील वर्षी देखील पावसाळ्यात गरीब होतकरू विद्यार्थ्यांना छत्री व रेनकोट वाटप करण्यात आले होते . याप्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आकाश धनगर, कार्यक्रमाधिकारी प्रा. पंकज रविंद्र पाटील उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे यांच्या मार्गदर्शनानुसार वरील उपक्रम उपक्रम राबविण्यात आला.