Home क्राईम शासकीय महिला महाविद्यालयाच्या आवारातून साहित्यांची चोरी

शासकीय महिला महाविद्यालयाच्या आवारातून साहित्यांची चोरी


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । मोहाडीरोड वरील शासकीय महिला रुग्णालयात आवारातून इलेक्ट्रिक बॅटऱ्या, सबमर्सिबल पंप, लोखंडी आसारी आणि ईलक्ट्रीक केबल असा एकूण १ लाख २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती अशी की, जळगाव शहरातील मोहाडीरोड वरील असलेल्या शासकीय महिला रुग्णालय येथे अज्ञात चोरट्यांनी रुग्णालयाच्या मालकीचे ३ इलेक्ट्रिक बॅटऱ्या, सबमर्सिबल पंप, लोखंडी आसारी, ईलेक्ट्रीक केबल असा एकूण १ लाख २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी २ मार्च सायंकाळी ६ ते ४ मार्च सकाळी ९ वाजेच्या दरम्यान चोरून नेला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर येथील कर्मचारी आयुष मणियार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवार ४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound