दगडाने ठेचून खून करणाऱ्या दोघांना जन्मठेप; एक निर्दोष

Landmark Supreme Court Judgment Mary Roy v. The State of Kerala 1

जळगाव प्रतिनिधी । चौघेजण एकत्र दारू पित असतांना एकाच्या ग्लासात दारू कमी टाकल्याचा राग आल्याने तिघांनी तरूणास बेदम मारहाण करून डोक्यात दगड मारून खून केल्याप्रकरणातील दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा तर एकास निर्दोष मुक्त केल्याचा निकाल आज जिल्हा न्यायालयाने दिला आहे.

याबाबत माहिती अशी की, सोनु गोरखसिंग साळुंखे (वय २०, रा.मेहरुण) याचा खुन झाला होता. मोहन उर्फ प्यारेमोहन चंद्रकांत जाधव (वय १९) व गुड्डु उर्फ कंचा वहाब शेख (वय २२, दोघे रा.तांबापुरा) या दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मच्छीद्र तुकाराम नाथ (वय २३, रा.तांबापुरा) याला निर्दोष मुक्त केले आहे.

२४ एप्रिल २०१८ रोजी दुपारी 3 वाजता मोहन, गुड्डु, मच्छींद्र व सोनु ते मेहरुण तलाव परिसरात दारु पित होते. यावेळी सोनु याने गुड्डुच्या ग्लासात कमी दारु भरली. यामुळे वाद सुरू होऊन त्यांनी सोनुला मारहाण केली होती. यानंतर सोनुचा मामा दीपक उर्फ बंडु प्रतापिसंग पाटील याने घटनास्थळी येऊन वाद मिटवला होता. यानंतर गुड्डु व मोहन या दोघांनी पुन्हा गोपाळ देवसिंग बाटुंगे याच्याकडून दोन दारुच्या बाटल्या आणल्या होत्या. सर्वजण पुन्हा दारु पिण्यासाठी निघुन गेले. दरम्यान, २४ रोजी रात्री सोनु घरी परतालाच नव्हता.

दुसऱ्या दिवशी २५ एप्रिल २०१८ रोजी दुपारी 2 वाजता मेहरुण परिसरातील बगीच्यात सोनुचा मृतदेह मिळुन आला होता. दगडाने ठेचुन त्याची हत्या केल्याचे समोर आले. त्यानुसार दीपक पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी मोहन, गुड्डु व मच्च्छींद्र या तीघांना तात्काळ अटक केली होती. सोनु याला जीवेठार मारल्याची कबुली त्यांनी दिली होती. यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान पाटील व भरत लिंगायत यांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोप सादर केले होते. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सुनावणीअंती न्यायालयात मोहन व गुड्डु यांना दोषी धरुन शिक्षा ठोठावली. तर मच्छींद्र याला निर्दोष मुक्त केले. सरकारपक्षातर्फे अॅड.केतन ढाके यांनी काम पाहिले.

Protected Content