भाजयुमोतर्फे अविरतपणे सेवा देणार्‍या बँका व पतसंस्थांच्या कर्मचार्‍यांचा सन्मान

धरणगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या कालावधी अविरतपणे सेवा देणार्‍या शहरातील बँका व पतसंस्थेच्या कर्मचार्‍यांचे येथील भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी आभार मानले.

याबाबत वृत्त असे की, कोरोना महामारी मुळे मार्च अखेरीस पासून लॉकडाऊन लागला असून यामुळे देशातील सर्व व्यवहार बंद झाले परंतु नागरिकांना जीवन जगण्यासाठी जीवनावश्यक वस्तू व अन्न धान्य आणि बाजीपाला तसेच औषधी यांची गरज भासत होती आणि त्यासाठी रोकड त्यांना बँकांनी उपलब्ध करून दिली. त्यात पंतप्रधान मोदींनी महिलांचा जनधन खात्यात आणि श्रावणबाळ योजनेतील खात्यात पैसे पाठवल्या मुळे बँकिंग व्यवस्थेवरचा ताण अधिकच वाढला होता लांब लांब रांगा त्यामुळे बँकांसमोर लागल्या तरी सुद्धा त्यांनी आपल्या कमला प्राथमिकता देऊन या काळात धरणगाव शहरातील नागरिक शेतकरी व्यापारी यांना बँकिंग सेवा देऊन त्यांचे व्यवहार सुरळीत ठेवण्यास एक प्रकारे बँकांनी मदत केली. फिजीकल डिस्टन्सींगचे पालन करण्याचे कारण दाखवून बँक कर्मचार्‍यांनी सेवा देण्यास असमर्थता दर्शवली असती तर सर्व व्यवहार ठप्प झाले असते व त्याच्या परिणाम मार्केट वर व अर्थव्यवस्थेवर झाला असतात परंतु बँक कर्मचार्‍यांनी कोरोणा योद्धा प्रमाणे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नियमांचे पालन करून सुरळीतपणे बँक सेवा सुरूच ठेवली. याची दखल घेत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने त्यांची सदिच्छा भेट घेऊन गुलाब पुष्प देऊन त्यांचे आभार मानले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष कांतीलाल माळी, शहर सरचिटणीस सचिन पाटील, नगरसेवक ललित येवले, योगेश माळी, इच्छेश काबरा इ. कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, या संदर्भात बँक कर्मचार्‍यांशी चर्चा करत असताना विविध बँकांनी व पतसंस्थांनी लॉकडाऊन काळातील आपले अनुभव सांगितले त्यात बालाजी पतसंस्थेचे एक सहकारी कोरोना बाधित होऊन मृत्यू पावले. व दुसरा अनुभव धरणगाव अर्बन बँकेने लॉकडाऊन काळात आपल्या एटीएम मधून २० करोड रुपया पर्यंत पैसे उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली. त्यामुळे शेतकर्‍यांना व नागरिकांना वेळेवर रोकड उपलब्ध होऊ शकली.

Protected Content