भाजप बंडखोरांच्या साथीने महापालिकेत शिवसेनाच वरचढ (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी  । सध्या शिवसेनेने भाजपाला मोठे धक्के देण्याची मोहीम हाती घेतली असून मनपाच्या आज झालेल्या विविध चार प्रभाग समित्यांवर बंडखोरांनी आपले वर्चस्व सिध्द केल्याचे दिसून आले आहे. हा भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का मानला जात असल्याचे समोर आले आहे.

प्रभाग समिती क्र. एक मध्ये सचिन पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.  प्रभाग समिती क्रमांक दोन मध्ये प्रवीण कोल्हे विजयी झाले. त्यांना १३ मते तर त्यांचे विरोधक मुकुंद सोनावणे यांना ७ मते पडली. प्रभाग समिती क्रमांक तीन मध्ये रेखा चुडामण पाटील विजयी झाल्या. त्यांन १० तर त्यांचे विरोधक धीरज सोनावणे यांना ९ मते पडली. प्रभाग समिती क्रमांक चार मध्ये शेख हसीनाबी शेख शरीफ हे विजयी झाले. त्यांना १० तर त्यांचे विरोधक उषा संतोष पाटील यांना ६ मते मिळाली. या निवडणुकीत भाजप मधून शिवसेनेला मतदान करणाऱ्या बंडखोरांचे वर्चस्व दिसून आले. निवडीनंतर चारही नवनिर्वाचित सभापतींचा महापौर जयश्री महाजन उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यानंतर मनपात आतिषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला. याप्रसंगी महापौर जयश्री सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, चारही विजयी उमेदवार, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, गणेश सोनवणे, चेतन सनकत, नगरसेविका रंजना सपकाळे, ज्योती चव्हाण, पर्वता भिल आदी उपस्थित होते.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/1011312046322510

 

Protected Content