भडगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा-भडगाव सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपा पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराची सुरुवात झाली.
गुरुवार रोजी भाजपा पुरुस्कृत शेतकरी सहकार पॅनलचे सर्व उमेदवार व भाजपाच्या पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांसह आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला. असून भडगाव तालुक्यातील महानुभाव पंथाचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र कनाशी येथील श्री चक्रधर स्वामी महाराजांच्या मंदिरात दर्शन घेऊन नारळ अर्पण करत भडगाव तालुक्यातील आपल्या प्रचाराला सुरुवात केली.यावेळी सर्व उपस्थितीतांना भडगाव भाजपा तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील यांनी संबोधित केले.
पाचोरा तालुक्यातील प्रचाराची सुरुवात दिनांक १६ एप्रिल रविवार रोजी पाचोरा तालुक्यातील श्री.भैरवनाथ मंदिर सावखेडा येथे प्रचार नारळ फोडून पाचोरा तालुक्याच्या प्रचार दौऱ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
याप्रसंगी सर्व उमेदवारांसह पॅनल प्रमुख सतीश शिंदे, पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील, भाजपा जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, सरचिटणीस गोविंद शेलार, संजय पाटील, माजी सभापती बन्सीलाल पाटील, भाजपा जिल्हा पदाधिकारी प्रदीप पाटील, समाधान पाटील, मुकेश पाटील, समाधान मुळे, सुनील पाटील, वसंत पाटील, अनिल पाटील, समाधान मुळे, समाधान भोपे, दीपक पाटील, संदीप पाटील, शरद पाटील, रवींद्र पाटील, विजय पाटील, दिलीप पाटील, रमेश पाटील, सखाराम पाटील, दीपक पाटील, रतिलाल पाटील, शिवा पाटील, परेश पाटील, अक्षय मालचे, विजय पाटील, विलास पाटील, विनोद हिरे, रवींद्र पाटील, अनिस मण्यार, मनोज धाडिवाल, चेतन पवार, रामेश्वर पाटील, नकुल पाटील, कनाशी सोसायटीचे सर्व संचालक, कनाशी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, आदी पदाधिकारी उपस्थित होते.