भाजपा जिल्हा महानगरच्या युवा मोर्चा अध्यक्षपदी आनंद सपकाळे

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्हा महानगर अंतर्गत महत्त्वाचे मानले जाणारे युवा मोर्चाच्या अध्यक्ष पदी युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस आनंद लक्ष्मण सपकाळे यांची निवड करण्यात आली आहे. हि निवड जिल्हा महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी नुकतीच जाहीर केली आहे.

आनंद सपकाळे हे भारतीय जनता पक्षाचे २०११ पासुन सक्रिय कार्यकर्ते आहे. त्यांनी यापूर्वी युवा मोर्चाच्या महानगर उपाध्यक्ष व मंडल अध्यक्ष व युवामोर्चा च्या महानगर जिल्हा सरचिटणीसपदी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. वाल्मिकी नगर गणेश मंडळाचे कार्यकर्ते असुन आगामी काळात युवा मोर्चाचे मोठे संघटन तयार करून जळगाव शहरात प्रत्येक प्रभागात भाजपाच्या शाखा सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल माजी मंत्री आ.गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, वविभागीय संघटन मंत्री अॅड.किशोर काळकर, आ.राजूमामा भोळे , जि. प. अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे, खा.उन्मेष पाटील,, खा.रक्षा खडसे, डॉ.राजेंद्र फडके, आ. स्मिता वाघ, आ चंदूभाई पटेल, माजी आ. गुरुमुख जगवाणी, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, वि.क्षे.प्रमुख दीपक साखरे, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, स्थायी सभापती सुचिता हाडा, शोभा बारी व माजी युवा मोर्चाचे अध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी आभिनंदन केले.

Protected Content