भाजपावर प्रकाश आंबेडकर यांनी साधला निशाणा

 

मुंबई, वृत्तसेवा । भाजपतर्फे कोरोना काळात करण्यात येत असलेल्या राजकीय भाष्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत विपश्यना करण्याचा सल्ला दिला आहे.

राज्यात कोरोना संसर्ग वाढत असतांना राजकीय सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फ़ैरी झडत असतांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी भाजपावर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर आंबेडकर यांनी टीका केली असून, विपश्यना करण्याचा सल्ला दिला आहे. राज्य करोनाच्या संकटातून जात असतानाच राजकीय वर्तुळात राजकीय अस्थिरतेवरून टीकाटिप्पणी सुरू आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे .“सत्तेसाठी कासावीस झालेल्या भाजपाच्या चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे विरोधीपक्ष म्हणून प्रतीक्षा करावी आणि ते शक्य नसल्यास इगतपुरीमध्ये जावून विपश्यना करावी,” असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाच्या दोन प्रमुख नेत्यांना दिला आहे.

Protected Content