यावल प्रतिनिधी । काल भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या शेतकर्याच्या रास्ता रोको आंदोलन करणार्या कार्यर्त्यांवर पक्षपातीपणाने गुन्हे दाखल करण्याचा आरोप आज पक्षाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
याबाबत वृत्त असे की, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आज झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. काल दिनांक १ ऑगस्ट रोजी यावल शहरातील भुसावल टी पॉईटवर सकाळी ११ वाजेच्या वेळीस भाजपाच्या माध्यमातुन शेतकर्यांच्या प्रश्नासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलना संदर्भात येथील पोलीस प्रशासनासमाहिती देण्यात आली होती. असे असतांना देखील पोलीसांनी पक्षपातीचे धोरण घेत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याने संतप्त झालेल्या भाजपाच्या वतीने भाजपा यावल तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे व शहराध्यक्ष डॉ निलेश गडे यांनी पत्रकार परिषद घेवुन या कारवाईचा जाहीर निषेध नोंदविला आहे. या पत्रकार परिषदेत उमेश फेगडे यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीकास्त्र सोडले राज्यातील शेतकर्यांच्या प्रश्नासाठी एक गुन्हे काय आमच्यावर शंभर गुन्हे देखील दाखल केले तरी आम्ही शेतकर्यांच्या हितासाठी लढा देत राहु असे भाजपाचे शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले. त्यांनी या आधी कॉग्रेस आणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने अलीकडच्या काळात करण्यात आलेल्या आंदोलनाची माहीती देवुन सांगीतले की ही आंदोलने देखील लॉक डाऊनच्या काळात झाली मग त्यांच्यावर का गुन्हे दाखल करण्यात आली नाही असा सवाल देखील भाजपाच्या तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे व शहराध्यक्ष डॉ निलेश गडे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.