जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनीजवळील भाग्योदय कॉलनीत बंद घर फोडून रोख रकमेसह चांदीच्या मुर्त्यांची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नानासाहेब पुंडलिक ठाकरे (वय-६८) रा. भाग्योदय कॉलनी, गणेश कॉलनी जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. नानासाहेब ठाकरे यांचे घर १ जून सकाळी ११.३० ते २ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातील कपाटातून ५ हजाराची रोकड आणि २ हजार रूपये किंमतीच्या चांदीच्या दोन मुर्त्या चोरून नेले. गुरूवार २ जून रोजी नानासाहेब ठाकरे घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचे समोर आले. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरूवार २ जून रोजी रात्री ९ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ तुषार जावरे करीत आहे.