जळगाव : प्रतिनिधी । भाऊसाहेब राऊत विद्यालयात रामायणकार आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी मुख्याध्यापक एल.एस.तायडे व पर्यवेक्षक .एस.एम.रायसिंग यांनी आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले.सांस्कृतिक समिती प्रमुख तुषार भोई यांनी सूत्रसंचालन केले व आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या कार्याविषयी माहिती दिली.
याप्रसंगी .ए.एस.बाविस्कर, .विनोद कोळी, .प्रकाश मेंढे, .सुवर्णसिंग राजपूत, श्री.राजेश जाधव, .रवींद्र कोळी, .योगराज सोनवणे, श्रीमती अंजली पगारे, श्रीमती वैशाली नारखेडे, कैलास म्हसाणे, .रतीलाल पाटील, कैलास सपकाळे, .डिंगबर सोनवणे, .सागर हिवराळे,.राजेंद्र सपकाळे यांची उपस्थिती होती.