जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौकात भर दिवसा एका तरुणीने शिवीगाळ करून एका तरुणावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर रविवारी चांगलाच व्हायरल झाला होता. अखेर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असून दोघांना
अधिक माहिती अशी की, अजिंठा चौक परिसरात रविवारी ७ मे रोजी सकाळी ११ ते १ वाजेदरम्यान हॉटेल महेंद्राजवळ एक तरुण व एक तरुणीचा गोंधळ सुरु होता. काही वेळाने तरुणीने छोटा चाकू काढून तरुणाच्या छातीत वार केला. मात्र चाकूचे पुढील टोक लागल्याने तरुणाच्या छातीतून रक्ताची धार लागली. तरीही तरुणी चाकू मारण्याचा प्रयत्न करीत होती. तो तरुण मात्र हातातून चाकू हिसकवण्याचा प्रयत्न करीत होता. सुमारे अर्धा ते पाऊण तास हा गोंधळ सुरु होता. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांना मात्र या घटनेबद्दल कुठलीही कल्पना नसल्याचे समोर आले होते.
त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी प्रकरणाचा सोमवारी तपास करून छडा लावला. यात त्या तरुणीचे नाव माधुरी सागर सोनगिरे व संबंधित तरुण हा तिचा पती सागर भिकन सोनगिरे (दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी) असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघेही पती-पत्नी असून कौटुंबिक वादातून त्यांनी हा प्रकार केल्याचे दिसून आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी ८ मे रोजी सायंकाळी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. सदर कारवाई पोनि जयपाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली सफौ अतुल वंजारी, सुधीर सावळे, इम्रान सय्यद, योगेश बारी, छगन तायडे, किरण पाटील, मपोका मिनाक्षी घेठे यांनी केली आहे.