भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील कोठली शिवारातील ज्वारी पीकाची विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी भेट घेतली. तसेच शहरातील महिला मेळाव्याला भेट देवून पौष्टिक तृणधान्य प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी मार्गदर्शन केले.
२०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात असून कृषि विभागामार्फत जनसामान्यांपर्यंत पौष्टिक तृणधान्यांचे आरोग्य विषयक फायदे पोहचण्यासाठी जनजागृती सुरु आहे. पौष्टिक तृणधान्य क्षेत्र व उत्पादन बरोबरच लोकांच्या आहारात प्रमाण वाढावे या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जात आहेत त्यात प्रभात फेरी, पौष्टीक तृणधान्य मिनी किट वाटप, मिलेट ऑफ द मंथ संकल्पना, शेत तिथे तृणधान्य उपक्रम, विविध शाळा व विद्यालयांच्या सहभागाने प्रभात फेरी, बाईक रॅली, तृणधान्य प्रात्यक्षिके व जनजागृती कार्यक्रम राबविली जात आहेत. मिलेट ऑफ द मंथ संकल्पनेनुसार जानेवारी महिना बाजरी, फेब्रुवारी महिना ज्वारी , ऑगस्ट महिना राजगिरा, सप्टेंबर महिना राळा, ऑक्टोबर महिना वरई व डिसेंबर महिना नाचणी पिकांसाठी समर्पित केलेला असून त्यानुसार महिना निहाय व पिक निहाय कृषी विभागामार्फत विविध जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत रबी हंगामात फुले रेवती या वाणाचे शेत तिथे तृणधान्ये या संकल्पनेवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करून देण्यात आलेले होते तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत विविध पीक प्रात्यक्षिके घेण्यात आलेले होते.
विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ साहेबांनी मौजे भडगाव व कोठली शिवारातील ज्वारी पीक प्रात्यक्षिकांना प्रत्यक्ष भेट दिली त्याचबरोबर भडगाव येथे लक्ष्मण भाऊ मंगल कार्यालयात महिला मेळाव्यास उपस्थित राहून पौष्टिक तृणधान्य प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी PMFME योजने अंतर्गत ३५% अनुदान उपलब्ध असलेबाबत योजनेची सखोल माहिती दिली तसेच सदर वेळी पौष्टिक तृणधान्य सेल्फी पॉईंट चे उद्घाटन व ज्वारी पिकाच्या घरी पत्रिकांचे विमोचन मा आमदार किशोर आप्पा पाटील व मा मोहन वाघ साहेबांचे हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमात पौष्टीक तृणधान्ये आरोग्य विषय गुणधर्मांचे माहिती फलकांसह प्रदर्शन ठेवण्यात आलेले होते.तसेच सदर कार्यक्रमानंतर मौजे कोठली येथील पाटील राजेंद्र पाटील व रोहिदास पाटील यांचे फुले रेवती या पिक प्रात्यक्षिकास भेट देण्यात आली त्याचबरोबर कजगाव व पासर्डी शिवारातील सीमाबाई पाटील यांचे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभ दिलेल्या मोसंबी फळ बाग, राष्ट्रीय कृषी विकास यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ज्ञानेश्वर पवार यांचे रोटावेटर, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत वत्सलाबाई पवार यांचे पावर विडर, उप अभियान यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अतुल पाटील यांचे ट्रॅक्टर, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत कोकिळाबाई पाटील यांचे ठिबक सिंचन संच इ. ठिकाणी मा विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी भेट देऊन तपासणी दरम्यान शेतकऱ्यांशी चर्चा करून विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचत असल्याचे पाहून भडगाव कृषि विभागाचे कामगिरी बद्दल समाधान व्यक्त केले.