कैऱ्या तोडल्या म्हणून मुलाला झाडाला बांधून शिक्षा !

 

 

भडगाव  : प्रतिनिधी ।  कैऱ्या तोडल्या म्हणून  मागास समुदायातील एका अल्पवयीन मुलाला शेतमालकासह सालदाराने झाडाला बांधून ठेवल्याची संतापजनक घटना  अंजनविहीरे येथे तीन दिवसापुर्वी घडली या २ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे

 

मुलाला  झाडाला बांधल्याचा व्हीडीओ मोबाईलमध्ये काढून तो व्हाट्सअपवर व्हायरल केला गेला होता . पोलीस ठाण्यात शेतमालकासह सालदारावर गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

 

उल्हासनगर येथिल हा १७ वर्षीय  मुलगा  शिक्षण घेण्यासाठी तालुक्यातील अंजनविहीरे येथे मामाकडे आलेला होता. बारावी वर्गात शिक्षण घेणारा युवक तीन दिवसापुर्वी आपल्या आजीचे गुडघे दुखीचे औषधी घेण्यासाठी गिरड येथे गेला असता. औषधी घेऊन अंजनविहीरे येथे घरी परत येत असताना रस्त्यात त्याने गोपी पाटील याच्या शेतातील झाडाच्या कैऱ्या तोडल्या. त्यावेळी सालदार प्रवीन पावरा याने त्याला जाब विचारत शेतमालक गोपी पाटील यांस फोन करून शेतात बोलावून घेतले. नंतर दोघांनी मुलाला मारहाण करत दोराच्या सहाय्याने चिकूच्या झाडाला बांधले.

 

यावेळी ‘तो’ युवक शेत मालकास “मामा ! माझी चुक झाली, पुन्हा अस करणार नाही. अशी  विनवणी करत होता. गोपीने त्याचा व्हीडीओ मोबाईलमध्ये काढत व्हॉट्सअपवर व्हायरल केला. पुन्हा कैऱ्या तोडायला आला तर हातपाय तोडण्याची धमकी दिली.

 

या घटनेनंतर पीडित मुलाने घडलेला प्रकार मामा, आजीला व इतर नातेवाईक यांना सांगितला.

६ जुनरोजी रात्री उशिरा भडगाव पोस्टेला या मुलाने दिलेल्या फीर्यादीवरुन भादवी कलम ३४२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४, अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे ३ (१), सी, आर, एस, व माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम २००८ चे ६६ सी प्रमाणे गुन्हा दाखल करुन गोपी पाटील, प्रवीण पावरा  यांना अटक करण्यात आली . त्यांना जळगाव येथे विशेष न्यायालयात हजर केल्यावर  त्यांना न्यायालयीन कोठडी  सुनावली आहे. पुढील तपास डीवायएसपी कैलास गावडे करीत आहेत .

 

Protected Content