भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगीरीजी) महाराज यांच्या कृपाशिर्वादाने उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगीरीजी महाराज यांच्या प्रेरणेने ,आदेशानुसार व प.पु. स्वामी रामदेवजी महाराज,व डॉ. बाळकृष्णजी यांच्या पावन आशीर्वादाने,निसर्गरम्य वातावरणात नुतकतेच तीन दिवसीय निशुल्क योग संस्कार शिबीराचे मयुरेश लॉन्स,कोठली रोड, भडगांव येथे आयोजित करण्यात आले होते.
पतंजली योगपीठ हरिद्वार (उत्तराखंड) येथील प.पू. स्वामी रामदेवजी महाराज यांचे मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित व सिर्षाशनात जागतिक विक्रम रचियेता “आंतरराष्ट्रीय योगशिक्षक श्री. दिनेशजी भुतेकर”यांचे योग, प्राणायाम, ध्यान, आहार विहार, व्यायाम, रोगानुसार आसन इत्यादीचे प्रशिक्षण दिले. या शिबिराची सुरवात श्री बाबाजींच्या प्रतिमेचं पुजन व दिपप्रज्वलन हे डॅा गोकुळ पाटिल ,डॅा ईश्वरसिंग परदेशी, डॅा गणेश अहिरे, वजिरे सर, दिनेश भुतेकर, देवीदास दौलत पाटिल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले व सुत्रसंचालन माऊली हॅास्पिटलचे डॅा गणेश अहिरे यांनी केले ,या सुवर्णसंधीचा भडगांव तालुक्यांतील ६५ योगसेवकांनी लाभ घेतला. या योग शिबीराचे आयोजन जय बाबाजी भक्त परिवार व माऊली हॅास्पिटल ,क्रिटीकल केअर सेंटर भडगांव च्या वतीने करण्यात आले होते