Home Cities पाचोरा एनएसएसई परिक्षेत निधी पाटीलचे यश

एनएसएसई परिक्षेत निधी पाटीलचे यश


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा तालुक्यातील होळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी व प्राथमिक शिक्षक  टिकारामसिंग पाटील व प्राथमिक शिक्षिका मनिषा टिकारामसिंग पाटील पाटील यांची कन्या निधी टिकारामसिंग पाटील हिने इयत्ता ४ थी मध्ये एन. एस. एस. ई. परीक्षेत २०० पैकी १९२ गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

 

निधी हिने पहिली ते चौथीत सलग चार वेळा राज्यात गुणवत्ता यादीत नंबर मिळवण्याचा बहुमान मिळवला आहे. निधी पाटील हिस होळ ता. पाचोरा येथील शिक्षक साहेबराव चौधरी यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. निधी हिच्या यशाबद्दल तिचे सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.


Protected Content

Play sound