भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तहसील कार्यालयाच्या वतीने बुधवारी १५ मार्च रोजी जागतिक ग्राहक दिनानिमित्त शासकीय विश्रामगृह येथे जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र गिताचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार मोतीराय यांनी ग्राहक दिनानिमित्ताने मार्गदर्शन केले. तर तालुका कुषी अधिकारी बी.बी.गोर्डे, तहसीलदार मुकेश हिवाळे, सुरेश कोळी, सुरेश रोकडे, राजेश पाटील यांनी ग्राहकाचे सरक्षंण व अडचणी, हक्क मदत याबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी व्यासपीठावर भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे, तालुका कुषी अधिकारी बी.बी.गोर्डे, भडगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रावण लिंडायत, ग्राहक मंचचे पदधिकारी सुरेश कोळी, सुरेश रोकडे, पत्रकार अशोक परदेशी, नरेंद्र पाटील, निलेश महाले, अबरार मिर्झा, रवींद्र पाटील, ग्राहक मंचचे दिनेश पाटील, राजेश पाटील, पुरवठा निरीक्षक अधिकारी आर.एन.अहिरे, नायब तहसीलदार मोतीराय, व महिला व बालविकास प्रकल्पाच्या लता सांवत, पुरवठा निरीक्षक डि.व्ही.अमुतकर, पुरवठा लिपिक एस.डी.कांबळे, माजी नगरसेवक नथु अहिरे, रेशनदुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष जंयवत पाटील, सचिव लक्ष्मण पाटील यांच्यासह भडगाव तालुक्यातील सर्व रेशनदुकानदार बंधु उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी तहसील कार्यालयचे सर्व कर्मचारी व रेशनदुकानदार बंधु उपस्थित होते.